क्वालालंपूर – हमासविरूध्द संघर्षात व्यस्त असलेल्या इस्त्रायलला मलेशियाने मोठा झटका दिला आहे. या देशाने इस्त्रायलचा झेंडा असलेल्या सर्व मालवाहू जहाजांना आपल्या बंदरावर थांबण्यास मनाई केली आहे.
इस्त्रायल हमास संघर्षात गाझा पट्ट्यात अनेक पॅलेस्टींनींचा बळी जात असल्याच्या पाश्र्वभूमीवर निषेध म्हणून मलेशियाने हा निर्णय घेतला आहे. सोबत या देशाने इस्त्रायलयवर आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोपही केला आहे.
बुधवारी या संदर्भात बोलताना मलेशियाचे पंतप्रधान अनवर इब्राहीम म्हणाले, इस्त्रायलच्या क्रूर कारवाईच्या विरोधात आम्ही ही बंदी घातली आहे. त्यांनी युध्दाबाबत इस्त्रायलवर टीका करतानाच त्या देशाशी संबंधित सर्वच जहाजांना आपल्या बंदरांवर मनाई केली आहे.
मलेशियात मुस्लिम समुदायाची लोकसंख्या ६० टक्के आहे. त्यामुळे इस्त्रायलशी कोणतेही संबंध ठेवण्याची त्यांचीआता इच्छा नाही. अनवर यांनी यापूर्वीच पॅलेस्टीनला आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. एवढेच नाही तर त्यांनी पॅलेस्टीनला मोठी मदतही केलेली आहे. इस्त्रायलकडून गाझावर सातत्याने होत असलेल्या बॉम्बहल्ल्यांचा त्यांनी निषेध केला आहे.