मुंबई – बॉलिवूड अभिनेत्री ‘मलायका अरोरा’ ही फॅशन आणि स्टाईलची आयकॉन मानली जाते. आपल्या फोटोमुळे अभिनेत्री नेहमी चर्चेत असते. अभिनेत्री किंवा मॉडेलसोबतच ती एक जबरदस्त डान्सर, व्हीजे आणि टेलिव्हिजन प्रेझेंटर आहे. मलायका आज तिच्या फॅशन सेन्ससाठी खूप लोकप्रिय आहे.
ती बॉलिवूड इंडस्ट्रीतील टॉप मॉडेल्सपैकी एक आहे. या सगळ्याशिवाय मलायका खान कुटुंबापासून ते कपूर कुटुंबापर्यंत इंडस्ट्रीचा एक भाग आहे. दरम्यान, नुकतंच अभिनेत्रीचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये मलायका तिची आई जॉयस अरोरासोबत मुंबईतील हॉस्पिटलबाहेर असल्याचं दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मलायका आणि तिची आई हॉस्पिटलमध्ये तिचे वडील अनिल अरोरा यांना भेटण्यासाठी आली होती. गेल्या काही दिवसांपासून तिचे वडील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत तिच्या वडिलांची प्रकृती आणि आजाराबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये मलायका हॉस्पिटलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यादरम्यान तिने आपल्या आईचा हात धरला आहे. दोघे दवाखान्यातून बाहेर पडतात, मग गाडीत बसतात. या व्हायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल नेटकरी देखील अनेक तर्कवितर्क जुळवत आहेत.