bollywood : टायगर 3 सह चाहत्यांना परत सरप्राईज दिले जात आहेत. चित्रपटाच्या ट्रेलरनंतर, काही नवीन पोस्टर्स समोर आले आहे, तर आता निर्माते चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करणार आहे, या गाण्याचे टायटल ‘लेके प्रभु का नाम’ आहे. हे गाणे 23 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे.
या चित्रपटाच्या पहिल्या गाण्यातून सलमान खान आणि कतरिना कैफचा फर्स्ट लूकही समोर आला आहे, जो चाहत्यांना खूप आवडला आहे. हा पार्टी नंबर अरिजित सिंह आणि निखिता गांधी यांनी गायला आहे. संगीत प्रीतम यांनी दिले आहे, तर गीत अमिताभ भट्टाचार्य यांचे असून नृत्यदिग्दर्शन वैभवी मर्चंट यांनी केले आहे. हे गाणे तुर्कियेतील कॅपाडोशिया येथे चित्रित करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, अरिजित सिंगने टायगर 3 मध्ये तीन गाण्यांना आवाज दिला. याविषयी चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे, तब्बल 9 वर्षांनंतर या गायकाने सलमान खानसोबत एका प्रोजेक्टसाठी हातमिळवणी केली आहे. अलीकडेच अरिजितला सलमान खानच्या घरातून बाहेर पडतानाही दिसला होता.
2014 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान दोघांमध्ये भांडण झाले, तेव्हा सलमान खान आणि अरिजित सिंग यांच्यातील नात्यात दुरावा निर्माण झाला होता. हा कार्यक्रम सलमानने होस्ट केला होता. या घटनेनंतर सलमान खानने अरिजितवर त्याच्या चित्रपटांवर बंदी घातली.
या कार्यक्रमात अरिजितला त्याच्या एका गाण्यासाठी पुरस्कार मिळाला. हा गायक कॅज्युअल पोशाख आणि फ्लिप-फ्लॉप परिधान करून पुरस्कार स्वीकारण्यासाठी स्टेजवर आला, तेव्हा सलमानने गमतीने विचारले, “तुम्ही झोपत आहात का?” यावर गायकाने उत्तर दिले, “तुम्ही मला झोपवले होते.” यावर सलमान खानने उत्तर दिले की, ‘तुम ही हो’ सारखी गाणी वाजत राहिली तर ती त्याची चूक नाही. यानंतर अरिजित सिंगला सलमानच्या अनेक चित्रपटांमधून काढून टाकण्यात आले.