डान्सर रियलिटी शो असलेल्या “सुपर डान्सर चॅप्टर 4′ च्या परीक्षकपदी आतापर्यंत शिल्पा शेट्टी, गीता कपूर आणि अनुराग बासू हे तिघेजण दिसत होते. मात्र, आता शिल्पाच्या संपूर्ण कुटुंबाला करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे तिला क्वॉरंटाईन होणे भाग आहे.
त्यामुळे तिच्या जागेवर आता मलाइका अरोराची निवड करण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात रेमो डिसुझा आणि फराह खान हे दोघेजण शिल्पा आणि अनुरागच्या जागेवर परीक्षक म्हणून आले होते.
मात्र, नवीन ठिकाणी शूटिंग होणार असल्याने आणि शिल्पाला प्रवास करणे शक्य नसल्याने तिच्या जागेवर आता मलायका अरोरा दिसणार आहे. तेरेसा लुईस अनुराग आणि गीता कपूर यांनी पुढील एपिसोडसाठीचे शूटिंग सुरू केले आहे. तर मलाइका परीक्षकांच्या खुर्चीत लवकरच त्यांना सामील झालेली दिसेल.