पुणे – वानवडी भागामध्ये करोना बाधित रुग्ण व्हेंटिलेटरवर गेल्यामुळे डॉक्टरांना मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या चौघांना सत्र न्यायाधीश एस. एस. पिंगळे यांनी पंचवीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
असिफ कादीर शेख , जैद जुनेद घोडके, अफान अफताब फराश आणि अजिंक्य दत्तात्रय भांगे अशी त्या चौघांची नावे आहेत. चौघांवर भारतीय दंड संहिता कलम ३२३ , ५०४ व ३४ तसेच महाराष्ट्र वैद्यकीय सेवा करणारे सेवा व्यक्ती आणि इतर कलमानुसार गुन्हा दाखल केला होता.
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी लष्कर न्यायलय, पुणे येथे चौघांना हजर केले. त्यावेळी मुळ फिर्यादीतर्फे अॅड. तौसिफ शेख , अॅड. क्रांती सहाने व अॅड. दीपक गायकवाड यांनी बाजू मांडल्यानंतर जामीन फेटाळला होता.
त्यानंतर बचाव पक्षाच्या वतीने बाजूने अॅड .सुमेश नागपल्ली व अॅड. महेश गेनप्पा ( गवळी ) यांनी सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. तो अर्ज न्यायालयाने मंजूर केला.