पुणे – पुणे-दौंड मार्गाचा उपनगरीय रेल्वे मार्गात समावेश करावा, अशी मागणी पुणे ग्रामीण रेल्वे प्रवासी ग्रुपने केली आहे. याबाबत रेल्वे बोर्ड व राज्य शासनाला निवेदन पाठवण्यात आले आहे. पुणे-दौंड मार्गावर इलक्ट्रिक मल्टिपल युनिट (ईएमयू) दोन रेक दिले जाणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.
पण, ही कार्यवाही अजनूही झालेली नाही. या मार्गावर सध्या “डेमू’ धावते. पण, तिला सतत “क्रॉसिंग’ असतात. त्यामुळे प्रवासाला उशीर होतो, असे निवेदनात म्हटले आहे.
प्रवाशांच्या मागण्या आणि समस्या
- डेमूमध्ये अपुरे कोच असल्यामुळे गर्दी होऊन महिला प्रवाशांची असुरक्षितता निर्माण होते.
- ईएमयूचा रेक हा डब्यांचा असल्यामुळे त्यात महिला, साहित्य, दिव्यांग, फर्स्ट क्लास असे स्वतंत्र डबे द्या.
- डेमू-मेमूच्या तुलनेत ईएमयूची गती चांगली. हा रेक आरामदायक आहे.
- पुणे उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये हडपसर, मांजरी, लोणी, उरुळी, यवत, खुटबाव, केडगाव, कडेठाण, पाटस समाविष्ट करा.
- आष्टी-नगर मार्गावर आगीच्या घटनेमुळे पुणे-दौंड मार्गावरील डेमू-मेमू बदलाव्यात