#U19CWC : ‘मेहनत डॉट कॉम’….सेहवागकडून यशस्वी जैस्वालचे कौतुक

मुंबई : भारताच्या युवा क्रिकेट संघावर १९ वर्षाखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर मिळविलेल्या दिमाखदार विजयाबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. ही स्पर्धा भारतीय संघाला महान क्रिकेटपटू पुरविणारी खाण असल्याचे सांगत माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने सर्व खेळाडूंचे कौतूक केले आहे.

सेहवागने यशस्वी जैस्वालसह सर्व संघाचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर जे खेळाडू मेहनत घेतात तेच यशस्वी होतात, असे सांगत सेहवागने मेहनत डाॅट काॅम … अशी टॅगलाईन वापरून जैस्वालचे गुणगान केले.

मेहनत डॉट कॉम… असं लिहित त्याने यशस्वीचा त्याच्या पाणीपुरीच्या स्टॉलवरील एक फोटो आणि सामन्यात शतक झळकावल्यानंतरचा एक फोटो पोस्ट केला आहे.

आपल्या वडिलांबरोबर मुंबईतील रस्त्यावर पाणीपुरी विकणारा हा पोरगा मेहनतीच्या बळावर अफाट गुणवत्ता असलेला क्रिकेटपटू म्हणून नावारूपाला येत आहे, हे त्याने केलेल्या मेहनतीचेच फळ आहे, असेही सेहवागने व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.