मुंबई – जेष्ठ अभिनेते महेश मांजरेकर पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. महेश मांजरेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी कोर्टाने पोलिसांना त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार,पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. ज्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेचे संस्थाचालकांची होती. मांजरेकरांवर संस्थाचालकां विरोधात बदनामी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप आहे. याबाबत टेभुर्णी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. त्यासंदर्भात पंढरपूरच्या माढा न्यायालयाने टेभुर्णी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या अपघातात एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात अर्वाच्च वक्तव्य केल्या प्रकरणी हा पुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, टेंभुर्णीतील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर या दोघांच्या वाहनांमध्ये पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. मागील वर्षी 2021 साली हा अपघात झाला होता. त्यावेळी मांजरेकर यांनी बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता.