Mahadev jankar loksabha election 2024 : काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी हजेरी लावत महायुतीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर आज महायुतीकडून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष जानकर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.
महायुतीसोबत जानकर राहणार असल्यामुळे त्यांना कोणता मतदारसंघ मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. अशात आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जानकर यांच्या लोकसभा मतदार संघाची घोषणा केली आहे. | Mahadev jankar loksabha election 2024
महादेव जानकर यांचा बारामतीसह माढा अशा मतदार संघांवर प्रभाव आहे. त्यामुळे महायुतीला फायदा होणार असल्याचं बोललं जात आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार असतील अशी घोषणा सुनील तटकरे यांनी केली आहे. | Mahadev jankar loksabha election 2024
राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष श्री. महादेव जानकर परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. खा. सुनिल तटकरे यांची घोषणा@SunilTatkare @MahadevJankarR #NCP #ncpspeaksofficial #महायुती #LokSabhaElection2024 #parbhani pic.twitter.com/TkCyUgYHv0
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 30, 2024
ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार
जानकर यांना परभणीमधून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे ठाकरे गटाचं टेन्शन वाढणार आहे. कारण परभणीमध्ये जानकर यांची लढत ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय बंडू जाधव यांच्याशी होणार आहे. | Mahadev jankar loksabha election 2024