मुंबई – राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडीला आणखी एक धक्का बसला आहे. आता मुंबै बॅंकेतही सत्तांतर होणार असून भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर पुन्हा बॅंकेचे अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबै बॅंकेचे संचालक सिद्धार्थ कांबळे यांनी नुकताच आपल्या अध्यक्षपदाचा पदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर विठ्ठल भोसले यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.
मुंबै बॅंकेच्या शुक्रवारी पार पडणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवीण दरेकर यांचे अवघ्या सहा महिन्यांत मुंबै बॅंकेच्या अध्यक्ष पदावर पुनरागमन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठवाडा-विदर्भ सीमेवर अवैध दारू विक्री; दोघांना अटक
दरम्यान, प्रविण दरेकर यांची अनेक वर्षांपासून मुंबै जिल्हा बॅंकेवर असलेली सत्ता महाविकास आघाडीने खेचून घेतली होती. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: यावेळच्या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला होता. त्यावेळी महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले होते, त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादी कॉंगेसच्या सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली होती तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली होती.
राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता; मान्सून पुन्हा होणार सक्रिय