मराठवाडा-विदर्भ सीमेवर अवैध दारू विक्री; दोघांना अटक
Updated On:

हिंगोली – मराठवाडा-विदर्भ सीमेवर हिंगोली जिल्ह्यातील पानकनेरगाव येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पानकनेरगाव येथे काही दिवसांपासून अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. दोन तरूण दुचाकीवरून दारू घेऊन जात असताना ग्रामस्थांनी त्यांना अडवले. त्यांची विचारपूस केली असता ते दारू विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर येथील महिला सरपंच यांचे पती कुलदीप देशमुख यांसह ग्रामस्थांनी दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.





