डिंभे -आमोंडी (ता. आंबेगाव) गावाच्या हद्दीत गावठी दारू विकणाऱ्या शंकर गोतारणे (वय 22, रा. शिंदेवाडी) याचेवर कायदेशीर कारवाई केली, असल्याची माहिती घोडेगावचे सहायक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी दिली.
आमोंडी गावाच्या हद्दीत इनामवस्ती येथील घोडनदीच्या कडेला खडकडोह येथे एक इसम बिगर परवाना बेकायदा दारू विकत असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव यांना मिळाली.
त्यांनी संबंधित ठिकाणी पंचासमक्ष जाऊन शंकर शिवाजी गोतारणे हा ओळखीच्या लोकांना दारू विकताना आढळला. याबाबत तक्रार पोलीस हवालदार दिलीप वाघोले यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अपर्णा जाधव करीत आहेत.