पुणे – भारतीय रोलर स्केटिंग महासंघाने मोहाली (पंजाब) येथे आयोजित केलेल्या 59 व्या राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने रजतपदक प्राप्त केले. सलग तिसऱ्या वर्षी रोलर डर्बी गटात महाराष्ट्राने पदक मिळवले आहे.
गेल्या दोन वर्षी महाराष्ट्राने सुवर्णपदकाची कमाई केली होती. स्पर्धेच्या साखथी सामन्यात महाराष्ट्राने ओडीशा व तमिळनाडूचा पराभव केला होता. महाराष्ट्राच्या संघात पुण्याच्या श्रतिका सरोदे, वैदेही सरोदे, तनिष्का सिंग, मृगनयनी शिंदे, भूमी बांदल, कोमल साखरे, सानिया कुलकर्णी व विभा मुठेकर यांनी सरस खेळ केला. या मुलींना पुणे जिल्हा स्केटिंग संघटनेचे प्रशिक्षक दीपक पवार व आशुतोष जगताप तसेच महाराष्ट्र स्केटिंग संघटनेचे अध्यक्ष पी. के. सिंग यांचे मार्गदर्शन लाभते.