पुणे – कला, साहित्य आणि राजकारण अशा प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणारे ‘अभिजित बिचुकले’ त्यांच्या अनोख्या स्टाईलमुळे कायम चर्चेत असतात. बिचुकले यांनी आतापर्यंत अनेक निवडणूक लढल्या नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीही त्यांनी प्रयत्न केले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना सुद्धा अभिजित बिचुकले यांनी आव्हान दिल. तर 2019 च्या विधानसभा निवडणुकीती त्यांनी मुंबईतील वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणूनही निवडणूक लढवली.
सतत चर्चेत असणारे बिचकुले आता पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आज (दि. 24) अभिजित बिचुकले यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांनी त्यांची पत्नी ‘अलंकृता’ यांना आपल्या स्वभावानुसारच हटके पत्रं लिहिलं आहे. सध्या त्यांचं हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देण्यास सुरुवात केल्या आहे. या पत्रात अभिजीत बिचुकले यांनी पत्नी अलंकृता बिचुकले यांना चक्क “तुम्ही महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री व्हाल..’ असं म्हंटलं आहे.
अभिजीत बिचुकले यांच्या हटके शुभेच्छा..! वाचा काय लिहलं पत्रात?
“महाराष्ट्राच्या पहिल्या भावी महिला मुख्यमंत्री सौ. अलंकृताजी आपण माझी जीवनसाथी म्हणून जी साथ निभावत आहात त्यासाठी धन्यवाद ! आणि आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! कोणीही लग्नासाठी घातली नसेल अशी होती माझी मागणी आज आठवते आपल्या प्रेमाची जगा वेगळी प्रेम कहाणी ।।
मी सांगितले तुम्हाला अशाच मुलीशी करेन मी लग्न जिचे विचार असतील माझ्या सामाजिक व सांस्कृतिक विचारांशी संलग्न ।। म्हणालो होतो मी आपणास साताऱ्यातून उदयनराजेंच्या विरोधात उभे करणार ते ऐकूण तुम्ही दिलात होकार व सांगितले मी ही तुमची इच्छा पुर्ण करणार ।। २००९ साली उदयनराजेंच्या विरोधात उभी राहणारी ठरलात तुम्ही एकमेव महिला साताऱ्यातच नव्हे तर महाराष्ट्रातही तुमच्या नावाला मिळतो मान पहिला ।।
मीच केली तुम्हाला महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री करण्याची घोषणा आहे खात्री मला तुम्हीच न्याय दयाल नक्की सर्व सामान्य जना ।। गुरुदेव श्री. श्री. बाबा आणि आईंचा आहे आपल्यावर खुप सारा आशिष कधीच झुकणार नाही कोणा पुढेही आपल्या दोघांचे शिष ।। प्राध्यापिका, योग शिक्षिका, सुगरण अशी आहात तुम्ही अष्टपैलू गृहिणी संपुर्ण व्यक्तिमत्वातून दिसते तुमच्या साधी राहणी आणि उच्च विचार सरणी ।।
चि. अहम – महाराज व अस्मि ताईसाहेब यांच्या संगोपनातही नाही पडत तुम्ही कमी वारसा आपल्या घराण्याचा उज्वल करणार आपण याची आहे हीच हमी ॥ स्त्रीत्वाचा अभिमान तुम्हाला आणि स्त्रीयांच्या सर्व प्रश्नांची आहे तुम्हाला जाण तुम्हीच पहिली महिला मुख्यमंत्री व्हाल तरच वाढेल खरोखर महाराष्ट्राची शान ।। शिवछत्रपती, शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांची धरली आहे आपण कास हीच प्रार्थना श्रींच्या चरणी की व्हावे तुमच्या हातून नेहमीच जनतेचे कार्य खास ।। अभिजीत वामनराव बिचुकले..!’