मुंबई – अभिनेता शाहरुख खान सध्या आपल्या पठाण या चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. सध्या पठाणमधील दोन गाणी प्रदर्शित झाली असून दोन्हही गाण्यांमधील दीपिकाच्या बोल्ड लूकची देखील जोरदार चर्चा आहे. परंतु एका अभिनेत्याला मात्र पठाणमधील शाहरुखचा लूक न आवडल्याने त्याने थेट किंग खानला हा पाकिस्तान नसून भारत असल्याचे ट्विटद्वारे सुनावले आहे.
अभिनयानंतर चित्रपट समीक्षक अशी ओळख निर्माण केलेला कमल आर खान सोशल मीडियावरून सतत कोणाला ना कोणाला टार्गेट करत असतो. आता केआरकेच्या निशाण्यावर शाहरुख आहे. आपल्या ट्विटमध्ये केआरके म्हणतो,मी नुकतंच पठणचं झूम जा पठाण हे गाणं पाहिलं, बॉक्स ऑफिसवर आता या चित्रपटाला कोणीही वाचवू शकत नाही. शाहरुखने भारतीय प्रेक्षकांशी पंगा घेतला आहे,पठाणच वरचढ असून बाकी सर्व त्याच्यासमोर फिके आहेत. शाहरुखजी ये इंडिया है पाकिस्तान नही” अशा शब्दात के आर केने शाहरुखला सुनावले आहे.
I just watched song #JhoomeJoPathaan and now I can say that nobody can save this film at the box office. SRK is taking full Pangge with Indian audience. He is trying to show that Pathaans are superiors and all others are Halwa in front of them. SRK ji Ye India Hai Pakistan Nahi.
— KRK (@kamaalrkhan) December 22, 2022
पठाण या चित्रपटातील दीपिकाने परिधान केलेल्या कपड्यांवरून सुरु झालेला वाद अद्यापही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. सोशल मीडियावर अनेकजण शाहरुखच्या पठाणवर बंदीची मागणी करत आहेत. यासोबतच भाजपच्या काही नेत्यांनी देखील पठाणच्या प्रदर्शनावर आक्षेप नोंदवला आहे. यामुळे आता पठाण हा चित्रपट प्रदर्शित होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.