नेवासा – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित राज ठाकरे यांचे नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात ढोल – ताशांच्या निनादात व फाटक्यांच्या अतिषबाजीत आज सकाळी जंगी स्वागत करण्यात आले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,जिल्हा सचिव विलास देशमुख, तालुकाध्यक्ष दिंगबर पवार, शहराध्यक्ष रविंद्र पिंपळे,वाहतुक सेनेचे जिल्हाध्यक्ष दादा देशमुख, अवेश शेख, अविनाश गाढवे , सहकार सेनेचे तालुका सचिव सचिन गव्हाणे, महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष रजनी पंढुरे, श्रीरामपूर तालुकाधक्ष डॉ.संजय नवथर, विद्यार्थी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश दिवशे, संतोष कुदळे व मनसे सैनिकांनी ठाकरे यांचे यावेळी स्वागत करण्यात आले.
अमित ठाकरे शनिवारी सकाळी छञपती संभाजीनगरहून श्रीक्षेञ शनिशिंगणापूर येथे दर्शन घेवून नगर येथील विद्यार्थी सेनेच्या बैठकीला जात असतांना नेवासा फाटा येथे तालुकाध्यक्ष दिंगबर,विलास देशमुख,दादा देशमुख व पदाधिकाऱ्यांनी यावेळी सत्कर करुन स्वागत केले यावेळी मोठ्या संख्येने मनसेसैनिक उपस्थित होते