First Phase Voting : देशात लोकसभा निवडणुक 2024च्या पहिल्या टप्प्यातील मतदान शांततेत पार पडले. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील 102 जागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंत चांगले मतदान झाले. महाराष्ट्रात 54.85 टक्के, पश्चिम बंगालमध्ये 77.57 टक्के तर उत्तर प्रदेशात 57.54 टक्के मतदान झाले.
दरम्यान, महाराष्ट्रात गडचिरोली, भंडारा -गोंदिया, नागपूर, चंद्रपूर आणि रामटेक अशा पाच लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले.
#LokSabhaElections2024 | 77.57 % voter turnout was recorded in West Bengal Lok Sabha elections and 46.32 % in Bihar, an average of 59.71 % in the first phase till 5 PM. pic.twitter.com/xazUSvNmvt
— ANI (@ANI) April 19, 2024
भारतीय निवडणूक आयोगाच्या मते, पहिल्या टप्प्यात 16.63 कोटीहून अधिक मतदार आहेत. पुरुष मतदारांची संख्या 8.4 कोटी तर महिला मतदारांची संख्या 8.23 कोटी आहे. प्रथम मतदारांची संख्या 35.67 लाख आहे. 20 ते 29 वयोगटातील मतदारांची संख्या 3.51 कोटी आहे. 1.87 लाख मतदान केंद्रांवर मतदान होत आहे.
सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी –
पश्चिम बंगाल: 77.57%
त्रिपुरा: 76.10%
पुडुचेरी: 72.84%
आसाम: 70.77%
अरुणाचल प्रदेश: 63.26%
अंदमान आणि निकोबार: 56.87%
बिहार: 46.32%
उत्तर प्रदेश: 57.54%
उत्तराखंड: 53.56%
छत्तीसगड: 63.41%
जम्मू आणि काश्मीर: 65.08%
लक्षद्वीप: 59.02%
मध्य प्रदेश: 63.25%
महाराष्ट्र: 54.85%
मणिपूर: 67.46%
मेघालय: 69.91%
मिझोरम: 52.62%
नागालँड: 55.75%
राजस्थान: ५०.२७%
सिक्कीम: 67.58%
तामिळनाडू: 62.02%
दुपारी 1 वाजेपर्यंत 36.96 टक्के मतदान झाले –
उत्तराखंड: 37.33%
उत्तर प्रदेश: 36.96%
त्रिपुरा: 53.04%
पश्चिम बंगाल: 50.96%
मेघालय: 48.91%
मणिपूर: 46.92%
आसाम: 45.12%
पुद्दुचेरी: 44.95%
मध्य प्रदेश: 44.18%
जम्मू आणि काश्मीर: 43.11%
छत्तीसगड: 42.57%
तामिळनाडू: 39.51%
नागालँड: 39.66%
सिक्कीम: 36.88%
मिझोरम: 37.43%
अंदमान: 35.70%
अरुणाचल प्रदेश: 37.53%
राजस्थान: 33.73%
बिहार: 32.41%
महाराष्ट्र: 32.36%
लक्षद्वीप: 29.91%