मुंबई – 12वी च्या निकालाची विद्यार्थी मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र आज 12वी ची निकाल जाहीर होणार नाही. याबाबत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्याने एका वृत्तवाहीनाला माहिती देताना पुष्टी केली आहे.
एचएससी निकाल २०२१ जेव्हा जाहीर होईल तेव्हा तो. mahresult.nic.in या साईट वर उपलब्ध होईल असेही अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले आहे. .
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य बोर्डांनी दहावी, बारावीचे निकाल जाहीर करण्याची आज शेवटची तारीख असल्याने आज निकाल लागणार असे विद्यार्थ्यांसह सर्वांनाच वाटत होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) बारावीचा निकाल जाहीर करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती. मात्र सर्वांनाच निकालाची वाट बघावी लागणार आहे.