हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ‘अ’ संघाचा सलग दुसरा विजय

महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग स्पर्धा

पुणे  – यश नाहर(4-54)याने केलेल्या सुरेख गोलंदाजीसह अजिंक्‍य नाईक याच्या 93 धावांच्या खेळीच्या जोरावर हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब संघाचा 23 धावांनी पराभव करून येथे होत असलेल्या हेमंत पाटील प्रतिष्ठान यांच्या तर्फे व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट प्रिमियर लीग 2019 एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत आपली विजयी मालिका कायम ठेवली.

सिंहगड रोड येथील व्हिजन क्रिकेट अकादमी मैदान येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रथम फलंदाजी करताना हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ संघाने 50 षटकात 6 बाद 247धावा केल्या. अजिंक्‍य नाईकने 98 चेंडूत 10 चौकार व 3 षटकारासह 93 धावांची संयमपूर्ण खेळी केली. अजिंक्‍य व ऑस्टिन लाझरस(50 धावा)यांनी दुसऱ्या गडयासाठी 68 चेंडूत 52 धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनतर यश नाहर 40, अनिकेत पोरवाल 26 यांनी धावा काढून संघाला भक्कम अशी धावसंख्या उभारून दिली.

याच्या उत्तरात हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब संघाचा डाव 37.5षटकात 224धावावर संपुष्टात आला. किर्तिराज वाडेकरने 85 चेंडूत 71धावा व सागर मगरने 44 चेंडूत 35धावा केल्या. या सलामीच्या जोडीने 47 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. पण हे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर ओंकार खाटपे 24(29), शुभम उपाध्याय 25, अविनाश शिंदे 22यांच्या धावा वगळता एकही फलंदाज दुहेरी धावसंख्या उभारू शकला नाही. एचपीसीए अ संघाकडून यश नाहरने फलंदाजीप्रमाणे गोलंदाजीतही कमाल करत 54 धावात 4 महत्वपूर्ण गडी बाद केले.

सविस्तर निकाल: साखळी फेरी:

हेमंत पाटील क्रिकेट अकादमी अ: 50 षटकांत 6 बाद 247 (अजिंक्‍य नाईक 93, ऑस्टिन लाझरस 50, यश नाहर 40, अनिकेत पोरवाल 26, शुभम कोठारी 3-52, शुभम उपाध्याय 1-15, किर्तिराज वाडेकर 1-23) वि.वि. हेमंत पाटील क्रिकेट अकादमी ब: 37.5 षटकांत सर्वबाद 224 (किर्तिराज वाडेकर 71, सागर मगर 35, ओंकार खाटपे 24, शुभम उपाध्याय 25, अविनाश शिंदे 22, यश नाहर 4-54, धनराज परदेशी 3-40, ऋषी अग्रहर 2-47, ऑस्टिन लाझरस 1-42) सामनावीर – यश नाहर.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.