मार ऑस्थाथियोस निमंत्रित हॉकी स्पर्धा : सुपर इलेव्हनचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पुणे  – सुपर इलेव्हन संघाने आपल्या नावाला साजेसा सुपर खेळ करत राजा बंगला स्पोर्टस सेंटरचा 7-1 असा धुव्वा उडवत येथे होत असलेल्या पहिल्या मार ऑस्थाथियोस निमंत्रित हॉकी स्पर्धेच्या उपांत्यापूर्व पेरीत प्रवेश केला.

मेजर ध्यानचंद मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत तब्बल सात वर्षांनी हॉकी मैदानावर उतरणाऱ्या राजा बंगला स्पोर्टस सेंटर संघाला सुपर इलेव्हनच्या खेळाचा सामना करण्यात अपयश आले. सामन्याच्या 11व्या मिनिटालात सुपर इलेव्हन संघाने राजा बंगला संघाचा बचाव भेदून आपले खाते उघडले.

आनंद गायकवाडने हा गोल केला. या गोलनंतर राजा बंगला संघाचे खेळाडू चेंडूंच्या शोधातच मैदानात फिरताना दिसून आले. सुपर इलेव्हनच्या खेळाडूंनी वेगवान खेळ करून त्यांच्यावर कमालीचे दडपण ठेवले. या वेगवान खेळात तीन मिनिटात दोन गोल करून आकाश सपकाळने संघाची आघाडी वाढवली. प्रथम 27व्या मिनिटाला आणि नंतर 30व्या मिनिटाला गोल करून त्याने संघाला मध्यंतराला 3-0 असे आघाडीवर नेले.

उत्तरार्धात वेगळे चित्र दिसले नाही. मिनिटागणिक सुपर इलेव्हनची आघाडी वाढतच होती. आनंदने 42, संकेत सपकाळ (52वे मिनिट), शकिब इनामदार (53, 56वे मिनिट) यांनी धडाधड गोल करून सुपरची आघाडी भक्कम केला. संपूर्म सामन्यात 54व्या मिनिटाला राजा बंगला संघाने गोल केला. त्यांच्या शालेम गवारे याने हा गोल केला.

सविस्तर निकाल –

सुपर इलेव्हन 9 (आनंद गायकवाजड 11 व 42 मि, आकाश सपकाळ 27 व 30 मि, संकेत सपकाळ 52 मि, शकिब इनामदार 53 व 56मि) वि.वि. राजा बंगला स्पोर्टस सेंटर 1 (शालेम गवारे 54 मि)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.