हरियाणा उपविजेता तर दिल्ली तिस-या स्थानावर
गुवाहटी (आसाम) : खेलो इंडिया युथ गेम्सच्या तिस-या पर्वात वर्चस्व राखत महाराष्ट्राने सलग दुस-या वर्षी विजेतेपद पटकावले. गतवर्षी पुण्यात झालेल्या दुस-या खेलो इंडिया स्पर्धेत २२७ पदकांसह महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते. यंदा त्यापेक्षाही अधिक २५६ पदकांची कमाई करून महाराष्ट्र अंजिक्य ठरला आहे.
Maharashtra claims the Numero Uno position at the Khelo India Youth Games yet again! All hail the champion state!#KIYGClosingCeremony #KheloIndia #KIYG2020 #KheloIndia2020 #ChaloGuwahati@KirenRijiju @sarbanandsonwal @RijijuOffice @PMOIndia @CMOfficeAssam @IndiaSports pic.twitter.com/9tEsWNcU8g
— Khelo India (@kheloindia) January 22, 2020
या स्पर्धेत महाराष्ट्राने ७८ सुवर्ण, ७७ रौप्य आणि १०१ ब्राँझपदकांची कमाई केली आहे. स्पर्धेत महाराष्ट्राने २० पैकी १९ क्रीडा प्रकारात सहभाग घेतला. यात महाराष्ट्राने जलतरणात सर्वाधिक ४६ पदके ( १८ सुवर्ण, १५ रौप्य, १३ ब्राँझ) तर त्याखालोखाल जिम्नॅस्टिक्समध्ये ४०, कुस्ती ३१, अॅथलेटिक्स २९, वेटलिफ्टिंग २५ पदके मिळविली.
Haryana reaches its double century with 200 medals, and end the Khelo India Youth Games 2020 as the 1st runner up!#KIYGClosingCeremony #KheloIndia #KIYG2020 #KheloIndia2020 #ChaloGuwahati@KirenRijiju @sarbanandsonwal @RijijuOffice @PMOIndia @CMOfficeAssam @IndiaSports pic.twitter.com/qKcFv1INEh
— Khelo India (@kheloindia) January 22, 2020
स्पर्धेत महाराष्ट्रा पाठोपाठ हरियाणाने २०० पदकांसह दुसरे स्थान पटकावले आहे. हरियाणाने ६८ सुवर्ण, ६० रौप्य आणि ७२ ब्राँझपदकांची कमाई केली आहे.
Delhi becomes only the 3rd state in the Khelo India Youth Games 2020 to reach triple figures in terms of medal tally. Well played, guys!#KIYGClosingCeremony #KheloIndia #KIYG2020 #KheloIndia2020 #ChaloGuwahati@KirenRijiju @sarbanandsonwal @RijijuOffice @PMOIndia pic.twitter.com/KgF7qO1j7E
— Khelo India (@kheloindia) January 22, 2020
खेलो इंडिया स्पर्धेत दिल्लीने १२२ पदकांची कमाई करत तृतीय स्थान पटकावलं आहे. यामध्ये दिल्लीने ३९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ४७ ब्राँझपदकांची कमाई केली आहे.