गेल्या वर्षी वाढली 68 लाख खाती
पुणे – आर्थिक परिस्थितीमध्ये चढ-उतार होत असले तरी म्युच्युअल फंडातील खात्यांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षी भारतात म्युच्युअल फंडासाठी 68 लाख नवी खाती उघडली गेली. आता, म्युच्युअल फंडातील एकूण खात्यांची संख्या 8.7 कोटी इतकी झाली आहे.
याचा अर्थ म्युच्युअल फंडाची संबंधित जोखीमांचा अर्थ गुंतवणूकदारांना कळू लागला आहे, असे समजले जाते. मात्र कर्जरोख्यासंदर्भातील योजनांमधून फारसा प्रस्तावांना न मिळाल्यामुळे गेल्या 3 वर्षाच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षातील खात्याची संख्या वाढण्याचा वेग जरा कमी होता. एका व्यक्तीची म्युच्युअल फंडामध्ये अनेक खाती असू शकतात.
या संदर्भात उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार 44 फंडाकडील खात्यांची संख्या डिसेंबर 2018 मध्ये 8.03 कोटी होती ती डिसेंबर 2019 मध्ये 8.71 कोटी इतकी झाली आहे. त्यामध्ये 68 लाखांची भर पडली आहे. 2018 मध्ये 1.38 कोटी खाती, 2017 मध्ये 1.36 कोटी खाती, 2016 मध्ये 70 लाख खाती, 2015 मध्ये 56 लाख खात्यांची भर पडली होती, असे म्युच्युअल फंड नियंत्रक सेबीच्या अहवालात दिसून येते.
शेअर आणि शेअर संदर्भातील योजनासंबंधीच्या खात्यामध्ये 12.75 लाख खात्यांची भर पडून या खात्यांची संख्या 6.25कोटी झाली आहे. त्या अगोदरच्या वर्षी या खात्यामध्ये 1.2 कोटींची भर पडली होती. कर्जरोखे आधारित योजना संबंधातील खात्यांची संख्या गेल्या वर्षी 43 लाख लाखांनी वाढली आहे. त्यापूर्वीच्या वर्षी यामध्ये 71 लाखांची भर पडली होती.