शिक्रापुरात महाविकास आघाडीचे आंदोलन
बंद पाळून केंद्र सरकारचा निषेध
शिक्रापूर (वार्ताहर) – लखीमपूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने बंद पुकारला. त्यानुसार नागरिकांनी प्रतिसाद दिला. यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील मित्र पक्षांच्या वतीने आंदोलन करीत केंद्र सरकारचा निषेध करत शासनाला निवेदन दिले.
शिक्रापूर येथे शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पुणे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पंडित दरेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख पोपट शेलार, अनिल काशीद, शिवसेना महिला तालुकाध्यक्षा चेतना ढमढेरे, कॉंग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष अशोक भुजबळ, तालुकाध्यक्ष नामदेव खेडकर, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष वैभव यादव,
समता परिषदेचे सोमनाथ भुजबळ, शिक्रापूरचे उपसरपंच रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्य पूजा भुजबळ, विशाल खरपुडे, वंदना भुजबळ, सारिका सासवडे, बाजार समितीचे संचालक बाबासाहेब सासवडे, सुदीप गुंदेचा, काकासाहेब चव्हाण, गौरव करंजे, सुभाष खैरे, विजय लोखंडे, अमोल हरगुडे, आनंदा हजारे, रोहिदास शिवले, ऋषिकेश करंजे, मिलिंद शिंदे यांसह आदी उपस्थित होते. यावेळी आंदोलकांच्या वतीने शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांना निवेदन देण्यात आले.
आंदोलन संपताच व्यवसाय सुरू
केंद्र सरकारच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडी सरकारच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला असताना शिक्रापूर येथे बंद पुकारून आंदोलन करण्यात आलेले असताना नागरिकांनी व्यवसाय बंद ठेवले मात्र आंदोलन संपताच सर्वांनी आपापले व्यवसाय सुरू केल्याचे मात्र दिसून आले.