थेट “मातोश्री’वरून आली एकवीरा देवीला साडीचोळी

रायगड जिल्हाध्यक्ष बबन पाटील यांच्यामार्फत देवीचे ओटीभरण

मळवली -महाराष्ट्रातील लाखो भाविकांची श्रद्धास्थान असलेल्या व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील एकवीरा देवीला नवरात्र उत्सवानिमित्त मुंबई “मातोश्री’वरुन खणा-नारळाची ओटी रविवारी (दि. 11) आली.

रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील हे रविवारी घेऊन आले होते. ठाकरे परिवाराची कुलस्वामिनी असलेल्या आई एकवीरा देवीच्या दर्शनासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून ठाकरे परिवारातील सर्वजण दरवर्षी येतात. शिवसेना वाटचालीत देवीचे विशेष महत्त्व असून, कुठलीही निवडणूक लढवण्यापूर्वी एकवीरा देवीचे आशीर्वाद घेऊन साकडे घालायचे व नंतर फेडायला यायचे ही परंपरा ठाकरे घराण्याची आहे.

विधानसभा निवडणूक विजयी झाल्यावर सर्व विजयी उमेदवार एकवीरा देवी दर्शनासाठी आले होते. मागील दोन वर्षांपासून करोनामुळे येऊ शकत नसल्याने रविवारी रायगड शिवसेना जिल्हाप्रमुख बबन पाटील यांच्यामार्फत देवीसाठीओटी पाठवली.

यावेळी देवीचे ओटी घेऊन आलेल्या पाटील यांचे स्वागत एकवीरा देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड, कार्ला तलाठी मीरा बोऱ्हाडे, पोलीस पाटील अनिल पडवळ, संजय जाधव, वाकसई विभाग प्रमुख अनंता हुलावळे, अशोक कुटे, बाळासाहेब गायकवाड यांनी स्वागत केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.