मंचर-महाळुंगे पडवळ येथे पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन कट केली तसेच पाण्याची टाकी बांधण्याच्या कारणावरून मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी संजय गोरक्षनाथ आवटे यांनी फिर्याद दिली.
पाइपलाइन कट केल्याच्या कारणावरून शनिवारी (दि. 2) आणि मंगळवारी (दि. 5) प्रभाकर सहादू आवटे, भास्कर यशवंत आवटे आणि भानुदास रामचंद्र आवटे तसेच त्यांच्या घरातील लोकांबरोबर वाद झाला होते.
हा वाद मध्यस्थीमार्फत मिटविण्यासाठी बैठक बोलावली होती. अक्षय आवटे, भानुदास आवटे, राहुल आवटे, सूरज आवटे, रोहित आवटे, प्रभाकर आवटे, भास्कर आवटे, अलका आवटे, ओमकार आवटे हे सर्वजण तेथे आले. आपापसांत चर्चा सुरू असताना संजय यांचा भाऊ सचिन, आई सुनंदा, वडील गोरक्षनाथ यांना समोरच्या लोकांनी धक्काबुक्की करून हाताने मारहाण केली. या भांडणात आई सुनंदा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र गहाळ झाले आहे.