कोलकात्याचा प्रसिद्ध जादूगार ‘मँड्रेक’ला जलसमाधी

कोलकाता : कोलकात्याचे प्रसिद्ध जादूगार ‘चंचल लाहिरी’ (मँड्रेक) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. जादूचा धोकादायक प्रयोग करताना मँड्रेक यांचा मृत्यू झाला आहे.

स्वतःचे हात-पाय बांधून नदीत उडी मारायची आणि काही वेळाने स्वतःच बाहेर त्यातून पडायचं असा हा जादूचा प्रयोग होता. लाहिरींना एका बोटीतून हुगळी नदीच्या पाण्यात सोडण्यात आलं होतं. सहा कुलुपं आणि साखळ्यांनी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. आणि त्यानंतर लाहिरींना हुगळी नदीमध्ये सोडण्यात आले होते.

दरम्यान, त्यांचा हा जादूचा प्रयोग कोलकात्याच्या प्रसिद्ध हावडा ब्रिजवर असलेले सर्व नागरिक पाहत होते.  कालावधीनंतर त्यांनी पाण्यातून सुरक्षित बाहेर परतणं अपेक्षित होतं. मात्र, बराच कालावधीनंतर देखील मँड्रेक बाहेर आले नाही. उपस्थित लोकांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली.

कोलकाता पोलिसांनी आणि स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी हा भाग पिंजून काढल्यानंतर लाहिरी यांचा मृतदेह त्यांच्या हाती लागला. आणि त्यानंतरच लहरींना मृत घोषित करण्यात आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.