अयोध्या दहशतवादी हल्ला प्रकरण: चौघांना जन्मठेप तर एकाची निर्दोष मुक्तता

अयोध्या: अयोध्येतील राम जन्मभूमी येथे 2005 मध्ये करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी प्रयागराज येथील विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) मोठा निर्णय दिला आहे. या हल्ल्याप्रकरणी न्यायालयाने चौघांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तर एकाची निर्दोष मुक्तता केली आहे.

मात्र, यातील जन्मठेपेची शिक्षा सुनावल्या चौघांना न्यायालयाने प्रत्येकी ४० हजार रुपयांचा दंड देखील ठोठावला आहे. 5 जुलै 2005 रोजी सकाळी 9.15 च्या सुमारास दहशतवाद्यांनी रामजन्मभूमी परिसरात बॉम्बस्फोट घडून आणला होता. जवळपास अडीच तास चाललेल्या या चकमकीत पोलिसांनी 5 दहशतवाद्यांना ठार केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.