मुंबई – बॉलीवूड अभिनेत्रींमधली मैत्री क्वचितच पाहायला मिळते. इंडस्ट्रीत आज खूप कमी अभिनेत्री आहेत ज्या एकमेकांच्या चांगल्या मैत्रिणी आहेत. अशीच करिश्मा कपूर आणि माधुरी दीक्षित यांच्या मैत्रीच नातं नेहमीच बघायला मिळते.
View this post on Instagram
माधुरी दीक्षित आणि करिश्मा कपूर अनेकदा एकमेकांच्या पोस्टवर कमेंट करताना दिसतात. दोघांनी ‘दिल तो पागल है’ मध्ये एकत्र काम केले होते. या चित्रपटात करिश्माने निशाची तर माधुरीने पूजाची भूमिका साकारली होती. अशात पुन्हा एकदा त्या एकत्र दिसल्या आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये माधुरी आणि करिश्मा एकत्र डान्स आणि मस्ती करताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ करिश्मा कपूरने तिच्या इन्स्टा अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये ये जवानी है दिवानी या चित्रपटातील ‘बलम पिचकारी’ या गाण्यावर दोघीही डान्स करत आहेत. या व्हिडिओमध्ये दोघींची मजेशीर स्टाइल पाहण्यासारखी आहे.
करिश्मा आणि माधुरीला फ्रेममध्ये एकत्र पाहून चाहतेही खूप खूश झाले आहे. या व्हिडिओला लाखो लाइक्स आले आहेत, ज्यावर चाहते विविध प्रकारे कमेंट करत आहेत. चाहत्यांशिवाय स्टार्सही यावर कमेंट करत आहेत. अनेक युजर्सने दिल तो पागल है चित्रपटाच्या आठवणी कॉमेंट्समध्ये लिहिल्या आहे. तर काही युजर्सने शाहरुखची कमी असल्याचे म्हंटले आहे.