मुंबई – आजही बॉलीवूड अभिनेत्री ऑनस्क्रीन न्यूड सीन देणे टाळतात. विदेशात कथेनुसार बोल्ड किंवा न्यूड सिन देणं हे क्रिएटिव्हिटीचं लक्षण समजलं जात मात्र आपल्या देशात सेन्सॉर बोर्ड असल्यामुळे अशा गोष्टी ऑनस्क्रिन तितक्याशा स्वीकारल्या जात नाहीत. मात्र आज आपण अशाच एका सत्तरच्या दशकातील अभिनेत्रीबाबत जाणून घेणार आहोत जिने पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटासाठी न्यूड सिन दिला होता.
सत्तरच्या दशकातील काळात अभिनेत्री साडी आणि सलवार सूट घालत होत्या. यावेळी बॉलिवूड अभिनेत्रीही ऑनस्क्रीन बिकिनी घालणे टाळत असत. मात्र, या काळात ऑनस्क्रीन न्यूड सीन्स देऊन बॉलिवूडमध्ये खळबळ माजवणारी अभिनेत्रीच नाव होत सिमी ग्रेवाल. सिमी नेहमीच बॉलिवूडमध्ये आपल्या बोल्ड अंदाजासाठी चर्चेत राहिली.
सिमी ग्रेवालने ‘मेरा नाम जोकर’ या चित्रपटात एक सनसनाटी सीन दिला होता. राज कपूरच्या या चित्रपटात सिमीला झुडपांच्या मागे कपडे बदलताना दाखवण्यात आले होते. या सीनची खूप चर्चा झाली कारण 70 च्या दशकात असा सीन देणं खूप बोल्ड मूव्ह मानलं जात होतं.
‘मेरा नाम जोकर’नंतर सिमीने 1972 मध्ये रिलीज झालेल्या ‘सिद्धार्थ’ चित्रपटात न्यूड सीन देऊन खळबळ उडवून दिली होती. बॉलिवूडच्या इतिहासातील हा पहिला न्यूड सीन असल्याचे समजले जात होते. या सीनमध्ये सिमीला शशी कपूरसमोर विवस्त्र दाखवण्यात आले होते. या दृश्याला अनेक प्रसिद्ध इंग्रजी मासिकांमध्ये देखील स्थान मिळाले होते, ज्यामुळे बराच मोठा वाद झाला होता. यानंतर या चित्रपटावर भारतात बंदी घालण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे.
सिमीने अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिला पाहिजे तसे यश मिळाले नाही. यानंतर सिमीने ‘Rendezvous with Simi Grewal’ हा चॅट शो आणला, या शोमुळे सिमीला प्रचंड लोकप्रियता मिळाली. यानंतर अनेक वर्ष सिमी केवळ याच शोसाठी चहरसिहत राहिली होती.