मुंबई – अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा अनेकदा चर्चेत असतात. कधी दोघे एकमेकांसोबत फिरताना तर कधी फोटो पोस्ट करताना दिसतात. कधी या स्टार्सना ट्रोल केलं जातं तर कधी लाईकही केलं जातं. अर्जुन आणि मलायका अनेकदा एकमेकांवर किती प्रेम करतात हे व्यक्त करतात. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलायकाच्या प्रेग्नन्सीच्या अफवा समोर आल्या होत्या तेव्हा अर्जुन कपूरने अशा बातम्या पसरवणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता. आता बऱ्याच दिवसांनी अर्जुनने याबाबत स्पष्टीकरण दिल आहे.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मलायका अरोरा अर्जुन कपूरच्या मुलाची आई होणार असल्याची अफवा सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती आता अर्जुनने या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केले आहे. तसेच या सर्व गोष्टींचा आपल्या खाजगी आयुष्यावर कसा परिणाम होतो हे देखील सांगितले आहे.
अर्जुन कपूर म्हणाला की, मीडियाने असे काहीही सांगू नये ज्यामुळे एखाद्याचे आयुष्य बदलून जाईल. अर्जुन म्हणाला की निगेटिव्हिटी पसरवणे सोपे आहे कारण ती लोकांचे लक्ष वेधून घेते आणि काही काळ टिकते. एक अभिनेता म्हणून त्याचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच वैयक्तिक नसते आणि त्याला त्यात आनंदी राहावे लागते याची त्याला पूर्ण जाणीव आहे.प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी सेलिब्रिटी मीडियाची मदत घेतात. अशा परिस्थितीत माध्यमांनी वस्तुस्थिती तपासल्याशिवाय काहीही लिहू नये. असं स्पष्ट मत अर्जुन कपूरने यावेळी व्यक्त केले.
पहिल्यांदा कोणीही स्वतःप्रमाणे विचार करू नये आणि काहीही मनाप्रमाणे लिहू नये. मी आतापर्यंत माझ्या खाजगी आयुष्याबाबत काहीही लपवलेले नाही असंही अर्जुनने यावेळी स्पष्ट केले.
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या जवळपास पाच वर्षांपासून एकमेकांसोबत आहेत. ते अनेकदा एकत्र क्वालिटी टाइम घालवताना दिसतात. अर्जुन कपूर शेवटचा ‘कुत्ते’ चित्रपटात दिसला होता, जो बॉक्स ऑफिसवर खूप फ्लॉप ठरला. त्याचे आगामी चित्रपट ‘द लेडी किलर’ आणि मेरी पत्नी हे रिमेक आहेत.