आमदारकीचं स्वप्न अर्धवटच ! निकालपूर्वीच उमेदवाराचं करोनाने निधन

चेन्नई – देशभरात एकीकडे करोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. तर दुसरीकडे पाच राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीत होणारा प्रचार आणि प्रचारासाठी जमलेली गर्दी, करोना वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. प्रचारादरम्यान करोनाचे नियम पाळले नसल्याचे वारंवार स्पष्ट झालं आहे. यामुळे अनेकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तामिळनाडूत तर आमदार होण्याचं स्वप्न पाहात असलेल्या उमेदवाराचं करोनामुळं निधन झालं आहे.

तामिळनाडूमध्ये २३४ जागांसाठी एकाच टप्प्यात ६ एप्रिल रोजी मतदान पार पडलं. आता निकाल २ मे रोजी लागणार आहे. येथील श्रीविल्लीपुथुर विधानसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार पीएसडब्ल्यू माधव राव यांचा करोनाने बळी घेतला आहे. निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात माधव राव यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळं त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्यांच्या प्रकृतीत काहीही सुधारणा झाली नाही. आजअखेर त्यांची प्राणज्योत मावळली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे तामिळनाडू प्रभारी संजय दत्त यांनी ट्विट करून ही माहिती दिली.


तामिळानाडूत ६ एप्रिल रोजी मतदान पार पडलं आहे. त्यामुळे निवडणुक रद्द करण्यात येणार नाही. २ मे रोजी निकाल असून यात माधव राव विजयी झाल्यास पोटनिवडणूक घेण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.