M.S.Swaminathan: स्वतंत्र भारताच्या पहिल्या हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डाॅ. एम. एस. स्वामिनाथन (M.S.Swaminathan) यांचे आज सकाळी निधन झाले. ते 98 वर्षांचे होते.
स्वामीनाथन (M.S.Swaminathan) यांच्या पश्चात त्यांची पत्नी मीना आणि तीन मुली सौम्या स्वामीनाथन, मधुरा स्वामीनाथन आणि नित्या स्वामीनाथन आहेत.
भारतातील कमी उत्पन्न असलेल्या शेतकर्यांना अधिक उत्पादन देण्यास मदत करणाऱ्या धानाच्या उच्च-उत्पादक जाती विकसित करण्यात स्वामिनाथन यांचा मोठा वाटा होता.
स्वामिनाथन (M.S.Swaminathan) यांना 1987 मध्ये प्रथम जागतिक अन्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी चेन्नई येथे एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनची स्थापना केली.
अनेक पुरस्कारांव्यतिरिक्त, स्वामिनाथन (M.S.Swaminathan) हे रॅमन मॅगसेसे पुरस्कार (1971) आणि अल्बर्ट आइनस्टाईन जागतिक विज्ञान पुरस्कार (1986) प्राप्तकर्ते आहेत.