शिक्रापूर- करंदी (ता. शिरूर) येथील गुलाब चंद्रावळे यांच्या तीस फूट विहिरीमध्ये पडलेल्या अतिविषारी घोणसला विहिरीतून बाहेर काढत जीवदान देण्यात सर्पमित्राला यश आले आहे. करंदी येथील गुलाब चंद्रावळे हे त्यांच्या शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी विहिरीकडे गेलेले असताना त्यांनी विहिरीमध्ये पाहिले. त्यावेळी त्यांना विहिरीमधील पाण्यामध्ये मोठा साप असल्याचे आढळून आले.
त्यांनतर शिक्रापूर येथील सर्पमित्र शेरखान शेख यांना माहिती देण्यात आली. शेख यांनी तेथे पाहणी केली असता त्यांना विहिरीमध्ये घोणस असल्याचे आढळले. यावेळी सर्पमित्र शेख, गुरुदास चंद्रावळे, आयुब शेख, अर्शलान शेख आदींनी शिताफीने आणि एक तासाच्या प्रयत्नानंतर विहिरीमध्ये पडलेल्या घोणसला बाहेर काढले