किरण आहेर मित्र मंडळ, लायन्स क्लबचा उपक्रम
राजगुरूनगर -राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर मित्र मंडळ व लायन्स क्लब ऑफ राजगुरूनगर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाआरोग्य तपासणी शिबिरात 225 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. कॅन्सर तपासणी शिबिरात 98 महिलांची तपासणी करून सल्ला देण्यात आला, तर रक्तदान शिबिरात 110 जणांनी रक्तदान केले.
येथील आनंदी आनंद मंगल कार्यालयात रक्तदान शिबीर व मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन किरण आहेर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे , भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, पुणे जिल्हा भीमशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष विजुभाऊ डोळस, राजगुरूनगर सहकारी बॅंकेचे उपाध्यक्ष अरुण थिगळे, संचालक सागर पाटोळे, विजयाताई शिंदे, राहुल तांबे पाटील, हेमलता टाकळकर, राजेंद सांडभोर, रेवण थिगळे, जगन्नाथ राक्षे, लायन्स क्लबचे अध्यक्ष मिलिंद आहेर यांच्यासह क्लबचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रक्तदान शिबिरात 110 व्यक्तींनी रक्तदान केले. त्यांना प्रमाणपत्र, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. मधुमेह व रक्तदाब तपासणी व ईसीजी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्याचा 225 गरजू नागरिकांनी लाभ घेतला. मुंबई माता बाल संगोपन केंद्र येथे महिलांसाठी कॅन्सर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये 98 महिलांची मोफत तपासणी करून त्यांना योग्य सल्ला दिला. बॅंकेचे माजी अध्यक्ष किरण आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त नेहरू चौक येथे सत्यशीलराजे दाभाडे यांच्या उपस्थितीत अभिनेता अजय पुरकर व शिवभक्त सचिन गवळी यांच्या शिवव्याख्यानास व शिवशाहीर वैभव घरत यांच्या बहारदार पोवाड्याला हजारो राजगुरूनगरवासीयांनी हजेरी लावली