रेडा – राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर सोमवारी (दि.9) इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. इंदापूर येथील शहा संस्कृतिक भवन येथे कार्यकर्ता मेळावा असल्याचे तालुका संपर्कप्रमुख अण्णा पाटील यांनी सांगितले.
मंत्री जानकर हे विधानसभा निवडणुकीविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार असून इंदापूर तालुक्यातील राजकीय परिस्थितीत महत्त्वाचा मानला जात आहे. मंत्री जानकर हे या मेळाव्यामध्ये काय बोलणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यावेळी राज्य व जिल्हा पातळीवरील पदाधिकारी मेळाव्यास उपस्थित राहणार आहेत.