Lok Sabha Election 2024 । नाशिक येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी मोठी घोषणा केली. एकनाथ शिंदे यांच्याकडून नाशिकमध्ये खासदार हेमंड गोडसे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार, असं श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.
‘हेमंत गोडसे यांना तिसऱ्यांदा लोकसभेत पाठवायचं आहे,प्रभू रामाचा धनुष्यबाण नाशिकमध्येच राहणार असेही ते म्हणाले आहे. नाशिकमध्ये आज कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला श्रीकांत शिंदे यांनी उपस्थितीत लावली. या कार्यक्रमात श्रीकांत शिंदे यांनी हेमंत गोडसे यांची नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर केली.
मात्र या जागेवर मतदारसंघासाठी भाजपचे इच्छुक अस्वस्थ झाले आहे. कोणत्याही परिस्थितीत नाशिकची जागा मिळावी. अन्यथा येथील उमेदवार पराभूत होईल, असा दावा या भाजपच्या इच्छुकांनी केल्याने खळबळ उडाली आहे.
अशातच मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरातील काही आमदार तसेच लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी मुंबईला गेले होते. यावेळी ग्राम विकास मंत्री आणि नाशिकचे संपर्क नेते गिरीश महाजन यांच्याशी नाशिक मतदारसंघाबाबत चर्चा झाली.
गिरीश महाजन यांनी हा मतदारसंघ शिंदे गटाला आहे, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. हे पदाधिकारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट व्हावी यासाठी दिवसभर प्रयत्नशील होते. मात्र अतिशय व्यस्त कार्यक्रम असल्याने त्यांची फडणवीस यांच्याशी भेट होऊ शकली नाही. त्यामुळे हे सर्व पदाधिकारी पुन्हा नाशिकला परतले.
Lok Sabha Election 2024 । नाशिक मतदार संघाबाबत माध्यमांशी बोलताना इच्छुक उमेदवार दिनकर पाटील नेमकं काय म्हणाले…
‘हा मतदारसंघ भाजपचा असून गेल्या दोन वर्षांपासून आम्ही येथे काम केले आहे. येथे शिंदे गटाची फारशी तयारी नाशिक मतदारसंघात नाही. विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्या विषयी नाराजी आहे. त्यामुळे भाजपने हा मतदारसंघ आपल्याकडेच ठेवावा. शेवटपर्यंत तसे प्रयत्न आम्ही करणार आहोत असे सांगितले.