Kareena Kapoor South Debut| अभिनेत्री करीना कपूर सध्या ‘क्रू’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. य16 मार्च रोजी या सिनेमाचा ट्रेलरही रिलीज झाला आहे. करीनासह या चित्रपटात तब्बू आणि कृती सेनॉन मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. यातच आता बेबोच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. करीना कपूर साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मागील काही दिवसांपासून करिनाच्या साऊथ डेब्यूची चर्चा होती.
करीना साऊथ सुपरस्टार यशच्या कन्नडमधील ‘टॉक्सिक’ चित्रपटात दिसणार असल्याचे वृत्त समोर आले आहे. या चित्रपटाने करीनाने होकार दिल्याचे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये अभिनेत्री संवादादरम्यान आगामी चित्रपटाबद्दल सूचक विधान करते.
या व्हिडिओमध्ये करीना म्हणते की, “मी खूप मोठा साऊथ चित्रपट करणार आहे. आता हा एक पॅन इंडिया चित्रपट आहे, त्यामुळे शूटिंग कुठे होईल हे मला माहित नाही. मी माझ्या सर्व चाहत्यांना सांगायला खूप उत्सुक आहे की मी पहिल्यांदाच असं काही करणार आहे.”
Kareena Kapoor South Debut|
मात्र, या चित्रपटाबाबत निर्मात्यांकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. दरम्यान, काही दिवसांपूर्वी यशने त्याच्या आगामी टॉक्सिक चित्रपटाची घोषणा केली होती. हा चित्रपट 10 एप्रिल 2025 रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टॉक्सिक’ या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही किंवा करिनाने या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे नाव उघड केले नाही. Kareena Kapoor South Debut|
करिनाच्या आगामी ‘क्रू’ या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर हा चित्रपट 29 मार्चला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. ‘क्रू’ हा एक कॉमेडी चित्रपट असेल, या चित्रपटात दिलजीत दोसांझही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल आहे. याशिवाय करीना सिंघम अगेनमध्येही दिसणार आहे.
हेही वाचा:
स्टार किड्ससोबत लेकाची तुलना केल्याने आर माधवन नाराज; म्हणाला “मला अजिबात…”