Live Cricket Score, PBKS vs MI ,Indian Premier League 2024 : आज IPL 2024 चा 33वा सामना पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. हा सामना चंदीगड येथील मुल्लानपूर स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 सुरू होणार आहे. दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा होणार आहे.
या मोसमात या दोन्ही संघांची कामगिरी काही विशेष झाली नाही. पंजाबने 6 सामने खेळले असून या कालावधीत फक्त 2 मध्ये विजय प्राप्त केला आहे. तर मुंबईने 6 सामने खेळले असून त्यापैकी 2 जिंकले आहेत. मात्र, या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. पंजाबचा नियमित कर्णधार शिखर धवन गेल्या सामन्यात खेळू शकला नाही. या सामन्यातही तो खेळणार नाही.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुळे सात ते दहा दिवसांसाठी बाहेर आहे. त्याच्या जागी सॅम करन संघाची धुरा सांभाळत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Punjab Kings win the toss and elect to bowl against Mumbai Indians) मुंबई इंडियन्सचे खेळाडू प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरतील.
🚨 Toss Update 🚨
Punjab Kings win the toss and elect to bowl against Mumbai Indians.
Follow the Match ▶️ https://t.co/m7TQkWeGn7#TATAIPL | #PBKSvMI pic.twitter.com/soKlffZDxX
— IndianPremierLeague (@IPL) April 18, 2024
पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. अथर्व तायडेला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले आहे. त्याचवेळी जॉनी बेअरस्टो देखील आजच्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्यांच्या जागी रिली रुसोला संधी मिळाली आहे. मुंबईचा संघ पंजाबविरुद्ध कोणताही बदल न करता खेळताना दिसणार आहे.
PBKS vs MI : दोन्ही संघाचे Playing XI खालीलप्रमाणे….
पंजाब किंग्स : रिले रौसो, प्रभसिमरन सिंग, सॅम कुरान (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, शशांक सिंग, आशुतोष शर्मा, हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, कागिसो रबाडा, अर्शदीप सिंग.
इम्पॅक्ट सब : राहुल चहर, विद्वथ कावरप्पा, हरप्रीत भाटिया, शिवम सिंग, ऋषी धवन.
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, मोहम्मद नबी, जेराल्ड कोएत्झी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह.
इम्पॅक्ट सब : आकाश मधवाल, नुवान तुषार, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, नमन धीर.
आयपीएल 2024 मध्ये घरच्या वानखेडे मैदानावर सलग 4 सामने खेळल्यानंतर हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ आता पंजाब किंग्जचे आव्हान मोडून काढण्यासाठी मोहालीत पोचला आहे. हा सामना गुणतालिकेतील फरकासाठी आणि प्लेऑफसच्या स्पर्धेसाठी अत्यंत महत्वाचा आहे.