Lok sabha Election 2024 : महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जानकरांना लोकसभेची एक जागा देण्याचं देखील निश्चित झालं आहे. जानकर महायुतीतसोबत आल्याने ते बारामतीतमधून लोकसभा लढणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बारामती लोकसभेच्या जागेबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिल. | baramati Lok sabha Election 2024
भाजपने राज्यात २३ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर अजित पवार आणि शिंदे गटाच्या उमेदवारांची नावे केव्हा जाहीर होणार याची सर्वांना प्रतीक्षा आहे. अजित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने (अजित पवार गट) आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे. अजित पवार हे पुण्यात माध्यमांशी बोलत होते. | baramati Lok sabha Election 2024
यावेळी अजित पवारांना बारामती लोकसभेच्या जागेबाबत स्पष्ट विचारले असता ते म्हणाले,”बारामतीचा थोडा सस्पेन्स राहूद्या पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच 28 तारखेला जाहीर करणार असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.” तसेच निवडणूक प्रमुख म्हणून धनंजय मुंडे यांची निवड करण्यात आल्याचे देखील अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेच्या ४८ जागांपैकी ९९ टक्के जागांबाबत महायुतीचं एकमत झालं आहे. २८ मार्चला महायुतीची एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे. यात जागावाटप आणि उमेदवारांची अंतिम घोषणा केली जाईल.@AjitPawarSpeaks@SunilTatkare@dhananjay_munde#NCP #ncpspeaksofficial #mahayuti #LokSabhaElections2024… pic.twitter.com/2I6r0VCNSL
— MahaNCPspeaks (@mahancpspeaks) March 26, 2024
पहिला उमेदवार केला घोषित
राष्ट्रवादी – अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या लोकसभेच्या उमेदवारीची घोषणा अजित पवारांनी आज केली. तटकरे हे रायगड लोकसभा मतदारसंघातून पुन्हा लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. | baramati Lok sabha Election 2024