Lok Sabha Election । लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाने राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना जात, धर्म आणि भाषेच्या आधारावर मते मागण्यापासून दूर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासोबतच या निवडणूक प्रचार दरम्यान भक्त आणि देव यांच्यातील नात्यांची खिल्ली उडवू नये, असा सल्ला देखील त्यांनी दिलाय. राजकीय पक्षांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अडवाईझरीमध्ये आयोगाने आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवार आणि स्टार प्रचारकांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे म्हटलंय.
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेत मंदिर, मशीद, चर्च, गुरुद्वारा किंवा इतर कोणत्याही प्रार्थनास्थळाचा निवडणूक प्रचारासाठी वापर करू नये, असेही म्हटलंय. लोकसभा आणि चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस आधी ही सूचना जारी करण्यात आलीय.
राजकीय चर्चेला चालना देण्याची सूचना Lok Sabha Election ।
निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेत ज्या स्टार प्रचारक आणि उमेदवारांना यापूर्वी नोटिसा मिळाल्या आहेत त्यांना आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केल्याबद्दल कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी अलीकडेच राजकीय पक्षांनी नैतिक आणि आदरयुक्त राजकीय चर्चांना प्रोत्साहन दिले पाहिजे. तसेच वैयक्तिक टीकेऐवजी विचारांना प्रोत्साहन देतात.
स्टार प्रचारक आणि उमेदवारांना इशारा Lok Sabha Election ।
निवडणूक आयोगाने स्टार प्रचारक आणि उमेदवारांना ताकीद दिलीय, ज्यांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यांनी राजकीय पक्षांच्या निवडणूक प्रचारात मर्यादा राखण्याचा इशारा दिलाय. पक्षांना निवडणूक प्रचाराची पातळी मुद्द्यावर आधारित चर्चेसाठी वाढवण्याचे आवाहन केले. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी वस्तुस्थिती नसलेली विधाने करू नयेत किंवा मतदारांची दिशाभूल करू नये, अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
सोशल मीडिया ॲक्टिव्हिटींचाही सल्लागारात समावेश करण्यात आलाय, ज्यामध्ये प्रतिस्पर्ध्यांची बदनामी करणाऱ्या किंवा अपमान करणाऱ्या आणि प्रतिष्ठेचा अपमान करणाऱ्या पोस्ट करू नयेत किंवा असा मजकूर शेअर केला जाऊ नये, अशी सक्त ताकीद आयोगाकडून देण्यात आलीय.