झोप आणि नर्वस सिस्टीमसंबंधी समस्यांमध्ये काय संबंध आहे? याबाबत अधिक जाणून घेताना अभ्यासकांना आढळलं की, जर रात्री झोपताना सतत काही समस्या येत असेल किंवा झोपेत अडथळा निर्माण होत असेल किंवा तुम्हाला चांगली झोप लागत नसेल तर तुम्हाला मायग्रेनची समस्या होऊ शकते.
या रिसर्चचं महत्व यासाठी अधिक आहे कारण आतापर्यंत तणाव आणि इतर मानसिक-शारीरिक स्थितींनाच मायग्रेनचं कारण मानलं जात होतं. तसेच कोरोनाव्हायरसमुळे लोकं घरात बंदिस्त आहेत. मात्र कोरोनाबाबत ऐकून, वाचून ताण, चिंता वाढते आहे आणि यामुळे मायग्रेनची समस्या उद्भवते. अशावेळी मायग्रेनसारख्या आजारावर करा घरच्या घरी करा असे उपाय
योगा –
मायग्रेनची समस्या वारंवार उद्भवणे, त्याची तीव्रता आणि कालावधी कमी करण्यात योग फायदेशीर ठरतो, असं काही अभ्यासात दिसून आलं आहे.
लवंग पावडर –
डोक्यात तीव्र वेदना होत असतील तर लवंग पावडरही फायदेशीर आहे. एक ग्लास दुधात एक चमचा लवंग पावडर आणि एक चमचा मीठ टाकून प्या. यामुळे डोक्याच्या वेदना तात्काळ कमी होतील.
मध आणि आले –
एक चमचा आले ठेचून घ्या आणि त्यात मध मिसळून याचं सेवन करा. तुम्ही आल्याचा एक तुकडाही तोंडात ठेवू शकता.
तुळशीची पाने –
एक ग्लास दुधात 4 ते 5 तुळशीची पाने टाकून उकळून घ्या. हे दूध कोमट करून प्या. तुळशीच्या पाण्यात अँटिडिप्रेसेंट आणि अॅटिएंझायटी गुण असतात.