बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान म्हणते की, लॉकडाऊनमुळे तिला तिच्या कुटुंबाशी वेळ घालविता आला आहे. सध्या ती पती आणि अभिनेता कुणाल खेमू आणि मुलगी इनायासोबत मनोरंजक खेळ खेळण्याचा प्रयत्न करत राहते. लॉकडाऊनदरम्यान आपला वेळ कसा घालवत आहे, याबाबतही तिने आपल्या चाहत्यांना माहिती दिली.
मला पुस्तके वाचणे नेहमीच आवडते आहे आणि दररोज व्यस्त कामामुळे त्यासाठी वेळ काढणे कठीण होते. पण आता पुस्तके वाचणे ही माझ्या दैनंदिन कामात समाविष्ट केलेल्या गोष्टींपैकी एक गोष्ट आहे. त्याकरिता मी किमान एक तास देतो, असे सोहाने सांगितले.
सोहा म्हणाली, लॉकडाउनने आम्हाला नेहमीपेक्षा खूपच जवळ आणले आहे. मी आणि कुणाल हे सुनिश्चित करतो मी, आम्ही स्वतःला काही मनोरंजक गोष्टींशी जोडून घेतले पाहिजे. यासाठी आम्ही इनायाला कोडी, चित्र काढणे किंवा शिकणे यासारख्या विविध गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो.
तसेच सध्या करोना व्हायरस असल्याने सर्वजण घरातच आहे. या बिकट परिस्थितीत आरोग्याची विशेष काळजीही घेणे आवश्यक आहे. यासाठी मी स्वतः हेल्दी फूड बनविण्यास प्राधान्य देत आहे. याशिवाय जीम बदं असल्याने घरीच दररोज एक तास वर्कआउट करत असते, असे सोहाने सांगितले.