U12 SA CHAMPIONS TROPHY 2024 – एसए अजिंक्यपद करंडक १२ वर्षाखालील मुलांच्या आंतरक्लब टी-२० क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २६ मार्च ते १५ एप्रिल २०२४ या कालावधीत होणार आहे. ही स्पर्धा धायरी येथील सहारा क्रिकेट मैदानावर होणार आहे, अशी माहिती स्पर्धेचे संचालक शराफत अली शहा यांनी दिली.
साखळी आणि बाद फेरीमध्ये होणार्या या स्पर्धेत पुणे आणि परिसरातील एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत. या आंतरक्लब स्पर्धेत पुण्यातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यची संधी मिळणार आहे. लाल चेंडूवर होणार्या या स्पर्धेत एकूण ३१ सामने होणार आहेत.
स्पर्धेतील विजेत्या संघाला ३५ हजार रूपये आणि करंडक तर, उपविजेत्या संघाला २० हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू यांना रोख पारितोषिक आणि करंडक मिळणार आहे.
प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर अशी पारितोषिकांची रेलचेल स्पर्धेत असणार आहे. स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी आणि एसएआरके क्रिकेट अॅकॅडमी या दोन संघांमध्ये रंगणार आहे.