नवीदिल्ली – आपण सध्या वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अडकलेलो असताना एक मोठी घडामोड समोर आली आहे. नेदरलँडच्या कंपनीने सौर उर्जेवर चालणारी इलेक्ट्रिक फोर व्हीलर बाजारात आणली आहे. आपण अजून सीएनजी गॅसवर गाडी चालवून खुश आहोत आणि इलेक्ट्रिक गाडी घ्यावी की नको या पेचात आहोत. मात्र सौरऊर्जेवर चालणारी ही फोर व्हीलर इलेक्ट्रिक कार 700 किमी जाऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सौर वाहने अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. आता नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिल्या सोलर कारचे नाव LightYear 0 असं ठेवलं आहे. विशेष बाब म्हणजे ही सोलर-इलेक्ट्रिक कार आहे, जी एका चार्जवर सुमारे 700 किमीची रेंज देऊ शकते असं सांगितलं जात आहे. सध्या ही कार यूएईमध्ये सादर करण्यात आली आहे.तसेच सगळ्यांना या कारच्या किमतींविषयी प्रचंड कुतुहूल आहे.
UAE मधील इच्छुक खरेदीदार कंपनीच्या वेबसाइटवरून ही कार ऑर्डर करू शकतात.ही कार 2023 च्या सुरुवातीपासून ग्राहकांना उपलब्ध होईल असे देखील सांगण्यात आले आहे. तसेच ही कार टेस्ला मॉडेल एस पेक्षा दुप्पट कार्यक्षम आहे. या कारचे हायस्पीड १६० आहे आणि एकदा चार्ज केल्यानंतर किमान महिनाभर तरी वापरता येऊ शकते. गाडीच्या टेस्ट ड्राईव्हचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
Three months ago early customers put Lightyear 0’s aerodynamic capabilities to the test and discovered the thrills of coasting! Lightyear 0’s aerodynamic design turns coasting into a soaring adventure. Read more → https://t.co/GNBdZmmaNz pic.twitter.com/L9lw2sMaXD
— Lightyear (@lightyear_cars) October 13, 2022
कंपनीने आपल्या वेबसाइटवर या कारची किंमत 250,000 युरो म्हणजेच सुमारे 2 कोटी रुपये ठेवली आहे. गाडीला 60 KW चा बॅटरी पॅक देण्यात आला आहे. एका चार्जवर, गाडी बॅटरीपासून 625 किमी पर्यंत जाऊ शकते कारमध्ये 5 स्क्वेअर मीटरचे डबल वक्र सोलर पॅनल बसवण्यात आले आहेत.ज्यामुळे गाडी सहजतेने चार्ज करण्याला मदत होऊ शकते.