पुणे – शहरात बुधवारी दुपारनंतर काही भागांत पावसाच्या हलक्या सरी, तर काही ठिकाणी भुरभूर झाली. त्यामुळे उकाड्यापासून अंशत: दिलासा मिळाला. पुढील दोन दिवस दुपारनंतर ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरीची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
शहरात आजही कमाल तापमान 35 अंशापर्यंत पोहचले होते. त्यामुळे उन्हाचा चटक्याने दुपारी मुख्य रस्त्यावर वर्दळ काहीशी कमीच होती. पुणे शहर आणि जिल्ह्यावर हलक्या ढगांचा छोटासा तुकडा आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत खूप हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे काहीसा उकाडा कमी होईल, रात्री उशिरा, पहाटे धुक्यांची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. तसेच पुढील दोन दिवस शहरातील कमाल तापमान 35 ते 36 च्या आसपास राहील तर किमान तापमान 20 ते 21 च्या आसपास असेल.