मुंबई – साउथ फिल्म्सचा सुपरस्टार विजय देवराकोंडा आणि अभिनेत्री अनन्या पांडे यांचा बहुप्रतिक्षित ‘लाइगर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या चित्रपटातून विजय बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या अॅक्शनपॅक्ड चित्रपटाच्या ट्रेलरची जनता आतुरतेने वाट पाहत होती.
2 मिनिट 2 सेकंदाचा ट्रेलर एका संवादाने सुरू होतो. ज्यामध्ये विजयची आई म्हणते, ‘एक सिंह आणि वाघाचे बाळ आहे. क्रॉसब्रीड माझा मुलगा आहे.” पुढच्याच क्षणी विजय ऍक्शन करतांना दिसून येणार येतो. विजयचा नवा अवतार लोकांची मने जिंकत आहे. त्याचबरोबर लोकांनाही अनन्या खूप आवडते आहे.’
लीगरचा ट्रेलर रिलीज होताच विजयचे चाहते त्यांचे कौतुक करतांना दिसत आहे. चाहत्यांनी ट्विटरवर #Liger हॅशटॅग सुरू केले आहे. ट्रेलरमधील विजयची अॅक्शन पाहून लोकांनी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरणार असल्याचे म्हटले आहे.
चित्रपट निर्माता करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनलेला हा चित्रपट 25 ऑगस्ट रोजी हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या कथेत विजय स्ट्रीट फायटर ते एमएमए फायटर असा प्रवास करणार आहे.