भुलेश्वर – भुलेश्वर देवस्थानच्या विकासासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासन माजी आमदार रवींद्र मिर्लेकर यांनी दिले. ते 2019 या वर्षातील शेवटच्या सोमवार निमित्त भुलेश्वर देवस्थान येथे दर्शनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.
देवदर्शन झाल्यानंतर मंदिर प्रदक्षिणा मार्गावर असणाऱ्या शिल्पांची त्यांनी पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा करताना येथील अडचणी जाणून घेतल्या.
यावेळी हवेली तालुका शिवसेनेचे माजी तालुका संघटक स्वप्नील कुंजीर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे हवेली उपाध्यक्ष विजय चौधरी, मराठा महासंघाचे मयुर सोळस्कर यावेळी उपस्थित होते. भुलेश्वर देवस्थान, माळशिरस ग्रामपंचायत व पुजारी मंडळ यांच्या वतीने उपसरपंच मोहन यादव यांच्या हस्ते रवींद्र मिर्लेकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी माऊली यादव, तंटामुक्ती अध्यक्ष गणेश यादव, संतोष आखाडे, प्रदीप भोंडवे, संदिप आखाडे, समीर लोहकरे, पुजारी मोहन गाडेकर, राजेंद्र गाडेकर यावेळी उपस्थित होते.