मुंबई – ड्रग्ज प्रकरणात एनसीबीच्या कोठडीत असलेल्या आपल्या मुलाला ‘आर्यन खान’ला भेटण्यासाठी अभिनेता शाहरुख खान काही दिवसांपूर्वी आर्थर रोड तुरुंगात दाखल झाला होता. 21 ऑक्टोबरला म्हणजेच जवळपास तीन आठवड्यांनंतर बाप-लेकाची भेट झाली.
करोनाच्या काळात कैद्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, 21 ऑक्टोबरला भेटीची परवानगी पुन्हा देण्यात आली. आणि त्यानंतर पहिल्याच दिवशी शाहरुख ऑर्थर रोड तुरुंगात आपल्या लेकाला भेटण्यासाठी पोहोचला होता.
यावेळी शाहरुख एकटाच आपल्या मुलाला भेटण्यासाठी पोहोचला. या संभाषणादरम्यान, वडील आणि मुलगा यांच्यामध्ये काचेची भिंत होती. दोघेही इंटरकॉमद्वारे बोलले. ही भेट 16 ते 18 मिनिटे चालली. आणि त्यानंतर शाहरुख तेथून रवाना झाला.
आर्यन तुरुंगात गेल्यापासून शाहरूख तहानभूक विसरलाय. रात्रीची झोप विसरला आहे. जेव्हा शाहरुख आपल्याला मुलाला भेटण्यासाठी तुरुंगात गेला तेव्हा त्याचा चेहरा मास्कनं झाकलेला होता. डोळ्यांवर गॉगल होता. त्यामुळे कुणालाच त्याचा चेहरा नीट दिसला नाही. यावेळी त्याची एक छबी टिपण्यासाठी ऑर्थर रोड परिसरात प्रचंड गर्दी जमली होती.
पण सध्या सोशल मीडियावर शाहरुखचा एक फोटो चांगलाच व्हायरल झाला असून, अनेकांनी या फोटोवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. व्हायरल झालेल्या या फोटोत शाहरूखची दाढी वाढलेली दिसतेय. डोळ्यांखाली काळी वर्तुळ आहेत. डोळे लाल दिसत आहेत. हा फोटो शाहरूख आर्यनला भेटण्यासाठी आर्थर रोड तुरुंगात पोहोचला तेव्हाचा असल्याचा दावा केला जातोय. पण सत्य काही वेगळंच आहे.
शाहरुखचा हा फोटो तुरुंगा बाहेरील नसून, 2017 सालचा हा फोटो आहे. 15 मार्च 2017 रोजी शाहरूख खान अभिनेत्री आलिया भटच्या बर्थ डे पार्टीत सामील झाला होता. तेव्हाचा हा फोटो आहे. तेव्हाही शाहरूखचा हा फोटो तुफान व्हायरल झाला होता. हाच जुना फोटो आर्यन प्रकरणाच्या निमित्ताने पुन्हा एकदा व्हायरल होतोय.