मुंबई – आर्यन खान अमली पदार्थ प्रकरण आता भलत्याच वळणावर गेल्याचे दिसून येत आहे. आधी अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर लाच मागितल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यासंदर्भात खळबळजनक ट्विट केले आहे.
Pehchan kaon? pic.twitter.com/S3BOL4Luc8
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो शेअर केला आहे. यावेळी त्यांनी पेहचान कौन? असे त्या फोटाला कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या ट्वीटमध्ये एक समीर यांच्या संबंधित कागपत्र शेअर केले आहे त्या कागदपत्राला ‘यहाॅं से शुरु होता है फर्जिवाडा, असे कॅप्शन दिले आहे.
Sameer Dawood Wankhede का यहां से शुरू हुआ फर्जीवाड़ा pic.twitter.com/rjdOkPs4T6
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 25, 2021
मलिक यांनी ट्विट केलेल्या फोटोच्या सत्यतेबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. मात्र समीर वानखेडे यांचे पहिले लग्न झाल्याचा कथित फोटो मलिक यांनी शेअर केला आहे. त्यांचा हा फोटो सद्या सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसून .येत आहे. अभिनेत्री क्रांती रेडकर यांच्याशी विवाहबंधनात अडकण्याआधी समीर वानखेडे यांचा डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी विवाह झाला होता असा दावा केला जात आहे.
https://twitter.com/WarNishant/status/1452491341317869568