नवी दिल्ली – अयोध्या प्रकरणाचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. वादग्रस्त जागी राम मंदिर होईल असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. तर मशिदीसाठी पर्यायी पाच एकरची जागा देण्याचाही निर्णयही सर्वोच्च न्यायालयानं दिला.
याच पार्श्वभूमी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी एक आयोजित जनसभेत आपली प्रतिक्रिया ट्विटद्वारे दिली की,’ मला माझी मशीद परत हवी #IWantMyMasjidBack या हॅशटॅग वापरत ट्विट केले आहे.
I want my masjid back. https://t.co/S3gOvF7q95
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) November 15, 2019
दरम्यान ट्विटरवर ओवेसी केलेल्या ट्विटला नेटकऱ्यांनी चांगलंच ट्रोल केल्या जात आहे. सध्या ट्विटरवर ‘ओवेसी भारत छोडो’ हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्यांच्या या ट्विटवर यूजर्सनी खोचक शब्दात टीका केली आहे. तर याचप्रमाणे #IWantMyMasjidBack हा सुद्धा हॅशटॅग ट्रेण्ड करत आहे.याद्वारे ओवेसींवर युजर्सनी पलटवार केला आहे.